सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात होईल चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा विकास -नितीन गडकरी

Spread the love

पांढरकवडा-आर्णी क्षेत्रात अग्रोबेस्ड एमआयडीसी करणार- सुधीर मुनगंटीवार

जनचेतना/यवतमाळ/विजय मत्ते

7 एप्रिल – ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘अडव्हान्टेज चंद्रपूर’ आयोजन करून येथील औद्याग‍िक विकासाला चालना दिली आहे. क्रीडा, शिक्षण, सांस्‍कृतिक, जंगल, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात त्‍यांनी अनेक चांगले उपक्रम राबवले असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात यापुढेही चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील विकास झपाट्याने होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी पांढरकवडा येथल मित्र क्रीडा मंडळाच्‍या पटांगणात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

अडव्‍हांटेज चंद्रपूरमध्‍ये आलेले कोल इंडियाचे अध्‍यक्षांनी चंद्रपूरच्‍या कोळसा खाणीचा वापर मिथेनॉल निर्मितीसाठी करण्‍याचे ठरवले असल्‍याचे सांगत नितीन गडकरी यांनी त्‍यासाठी मुनगंटीवार यांनी केलेले प्रयास कौतुकास्‍पद असल्‍याचे सांगि‍तले. या सभेला भाजपाचे ज्येष्ठ माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, वणीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आर्णीचे डॉ. संदीप धुर्वे, ऍड निलय नाईक, पुसदचे इंद्रनील नाईक, यवतमाळ भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राष्ट्रवादी पार्टीचे वसंतराव घुईखेडकर, भाजपाचे ऍड राजेंद्र महाडोळे, भाजपा तालुका अध्यक्ष -पांढरकवडा – आनंद वैद्य, भाजपा तालुका अध्यक्ष -घाटंजी -सुरेश डहाके, भाजपा तालुका अध्यक्ष – आर्णी – किशन राठोड, लोकसभा विस्तारक रवी बेल्लुरकर, शहर अध्यक्ष किशोर देशेट्टीवर, शिवसेनेचे डॉ विष्णू उकांडे, विनोद मोहितकर, युतीचे सर्व पदाधिकारी, पक्ष प्रवेश केलेले गजानन बेजंकीवार, सोनू बोरेले उपस्थित होते.

पांढरकवडा आर्णी क्षेत्रात अॅग्रोबेस्ड एमआयडीसी आणण्यासाठी आपण जीवाचे रान करू आणि हे क्षेत्र समृद्ध करण्यार असल्‍याची घोषणा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. नितीन गडकरी यांच्‍या मार्गदर्शनामुळे विकास केंद्रित कामे करण्‍यास प्रेरित झाल्‍याचे त्‍यांनी सांगत त्‍यांनी वन अकादमी, बोटॅनिकल गार्डन, एसएनडीटी विद्यापीठ आदींचा उल्‍लेख केला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात रस्ते, पूल, अंडरपासची कामे करणार असल्‍याचा निर्धारही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.