शालेय विद्यार्थ्यां मार्फत मतदान जनजागृती अभियान

Spread the love

जनचेतना/कामठा गोंदिया/महेंद्र गजभिये

श्रीमती के एस जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत मतदान जनजागृती अभियान गावोगावी राबवण्यात आले इयत्ता सातवी, आठवी, व नववीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करत मतदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. “मत आहे आमचा अधिकार करू नका त्याला बेकार” “चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया” अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या तसेच शाळेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व रॅली, पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. सौ काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण केले.

याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका रझीया बेग मॅडम तसेच, प्राध्यापक मसराम सर व शिक्षिका सविता गिरी मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच इतर शिक्षक वृंद शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी आणि पालक वर्ग मतदान जनजागृती अभियानामध्ये सहभागी होते.