जनचेतना/मारेगाव/विजय मत्ते : दिनांक २४/७/२४ बुधवार हा पांदण रस्ता उन्हाळ्यात टाकला पावसाळ्यात वाहून गेला असे चित्र दिसले ह्या पांदन रस्त्याचे काम इतके निकृष्ट दर्जाचे होते की पांदनरस्ता पहिल्याच पाण्यात वाहून गेला सेलू खुर्द येथील शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये भेडसावत आहे पांदन रस्ता वाहून गेल्यामुळे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.
सेलो अपटी रस्त्यावर सेलची चाळीस टक्के जमीन ही ह्या पांदण रस्त्याने केली जाते पण तो पांदन रस्ताच वाहून गेला तर शेती करायची कशी याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे हा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन सोडवावा अशी सेलो वासियाची मागणी आहे ह्या रस्त्याने खात न्यायचं कसं ना बैलबंडी जातं ना माणसाला चालता येतं तर करायचं कसं तर प्रशासनाने या मुद्द्यावर त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित चालू करावे अशी गावकऱ्याची मागणी आहे.