जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
सुधीरभाऊ निवडणूक येते निवडणूक जाते.जो निवडून येते तो जनतेचा प्रतिनिधी होते.जो हारते तो विसरून जाते.त्यामुळे राजकीय आकस ठेऊन निवडणुकीच्या प्रचार सभेत काहीही अर्वाच्य शब्द प्रयोग करून तुम्ही काय साध्य करणार आहात? आम्ही महिला वर्ग भाजप मध्ये ही आहो व काँग्रेस मध्ये ही. आमची महिला ही जात आहे.व आम्हाला महिला म्हणून सन्मान आहे.कारण आम्ही जर नसतो तर तुम्ही नसते.म्हणजे तुमची आई जर महिला नसती तर तुमचा जन्म देखील झाला नसता.आणी तुमची पत्नी नसती तर तुमचा परिवार ही वाढला नसता. किमान आपल्या आईला,पत्नीला ,मुलीला तरी डोक्या समोर ठेऊन असे अश्लील शब्द टाळायचे असते.
अहो सुधीरभाऊ आम्ही तुम्हाला अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून जाणत होतो.पण ह्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही एकदम खालच्या स्तरावर उतरलात हो.का तर तुमच्या समोर एक विधवा महिला आहे? अहो ती विधवाच आहे हो.पण ती तुमची बहीण समजा ना.बहीण भावात स्पर्धा होत नाही का? जो जिंकेल त्याला माय बाप बक्षीस देतात अगदी तसेच आम्ही माय बाप जनता तुम्हाला मतदानाचे बक्षीस देऊ. परंतु तुमचं वागण बोलणं अस आणी ह्या स्तराला जाईल असे मुळीच वाटले नाही. तुम्ही तिला विधवा काय म्हणता ,काँग्रेस वाल्यांचा दाखला देत महिलांच्या कपडे सोडण्याची व झोपविण्याची भाषा काय करता. अहो ती विधवा महिला असली तरी ती नारी शक्ती आहे.हे तुम्ही कसे का विसरलात?
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेत एकूण मतदाराच्या तुलनेत 47% महिला मतदार आहे. आम्ही नुसत्या महिला जरी एकत्र विचार केला ना? तुम्ही कुठे जाल इतकेही तुम्हाला भान राहू नये.याचे प्रचंड वाईट वाटते. खरंच तुम्हाला विधवा महिलेकडून जिंकण्याचेही समाधान नाही व हारण्याचीही नामुष्की आहे म्हणून तुमची जीभ घसरत चालली आहे.हे स्पष्ट दिसते.तुम्ही मनुस्मुर्ती ग्रस्त विचाराने प्रेरित आहात तुम्ही महिलेचा सन्मान करू शकत नाही हेच स्पष्ट दिसते.त्यामुळे आम्ही महिलांनी तुम्हाला का म्हणून मतदान द्यावे ? म्हणून तुमच्या ह्या वक्तव्याचा आम्ही सर्व महिला (सर्व पक्षीय सुद्धा ) निषेध करतो.व सर्व महिलांना आव्हान ही करतो की,सुधीरभाऊ यांना महिलांचा सन्मान नाही त्यामुळे एकाही महिलेने सुधीर भाऊ यांना मतदान करू नये.तुमच्या ह्या अश्लील व असामाजिक वितृष्ट महिला अपमानाचा जाहीर निषेध.सुधीरभाऊ तुमचा जाहीर निषेध. तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष शिलाताई उईके, सयामताई, कविता ठवरे आणि समस्त काँग्रेस पक्षाचे महिला पदाधिकारी उपस्थित होते.