निमगाव आंबेनाला प्रकल्पाच्या अंतिम मान्यतासाठी आ.विजय रहांगडाले यांची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसोबत बैठक

Spread the love

जनचेतना/तिरोडा/दिपक जायसवाल

निमगाव आंबेनाला प्रकल्पास अंतिम मान्यता मिळून प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसोबत बैठक घेण्यात आली.यावर प्रकल्प सुरु करण्यासाठी मंत्री अति शीघ्र प्रकल्प सुरू करण्याकरिता कार्यवाही करण्याचे आदेश वनविभागास दिले हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडे सतत प्रयत्न सुरू असून प्रकल्प सुरू झाल्यानंतर लाभक्षेत्रातील सुमारे ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. अशी माहिती आ.विजय रहांगडाले यांनी दिले.

धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ चे पाणी खैरबंधा जलाशयात सोडण्यात आले व त्याचा लाभ आज शेतकऱ्यांना होत आहे. टप्पा २ चे पाणी बोदलकसा,चोरखमारा,रिसाळा,व भडभदया जलाशयात पाईपलाईनद्वारे सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. तसेच टप्पा २ चरण ३ अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील गुमडोह व पांगडी जलशयात सोडण्याच्या कामाला येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. त्याचबरोबर बोदलकसा व चोरखमारा तलावांतर्गत नहराचे संपूर्ण सिमेंटीकरण करण्याचे कामसुद्धा सुरु होणार आहे. त्याकरिता १५५.०० कोटी शासनाकडून मंजूर झाले आहेत.विधानसभा क्षेत्रात सिंचनविषयक सुविधा उपलब्ध करण्याकरिता माझे नेहमी प्रयत्न सुरु असून निमगाव (आंबेनाला) प्रकल्प सुरू करण्यासाठी आ.विजय रहांगडाले मंत्रालयात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घेतली.