जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे 24 जुलै रोजी 100 टक्के भरले असून ओव्हरफ्लो होत धरणाच्या सांडव्यावरुन 9 इंच ईतका पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने त्या अनुषंगाने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी इटीयाडोह धरणाला भेट देवून जलपूजन केले.या परिसरात लागवडी खालील क्षेत्रापैकी सुमारे 1 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवाती पासूनच पावसाचा लहरीपणा कायम राहिला.परिणामी धान पिकाची लागवडही उशिरा झाली.2024 यावर्षी च्या जुलै महिन्यात 19 जुलै ते 24 जुलै दरम्यान झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली.
यामुळे खरीप हंगामात पूर परिस्थिती दिसून आली.खरीप हंगामातील शेवटचे सत्र सुरू असून मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी आलेल्या दमदार मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, मोठे धरण,मोठे धरण,जलयुक्त शिवार योजनेतील तलाव,बोडी,मामा तलाव आदींमध्ये जवळपास 100 टक्के जलसाठा झाला.याचा प्रत्येक्ष लाभ धान पिकालाही झाला.त्यातच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे 100 टक्के भरताच आज 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह इटीयाडोह धरणाचे शासकीय जलपुजन केले.
तसेच गाढवी नदीच्या काठावरील गावांना आणि नदीपात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व सबंधितांनी काळजी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.तर धरण 100 टक्के भरल्याने उन्हाळी रब्बी हंगामाला गोंदिया,भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीला धरणाचा पाणी दिला जात असतो त्यामुळे शेतकरी देखिल आनंदी झाले. आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तर दुसरीकडे जलस्त्रोत निर्माण करणारे प्रकल्पही भरल्याने यंदाच्या हंगामात धान पिकाचे उत्पादन चांगले येणार अशी आशा वर्तविण्यात येत आहे.
यावेळी जलपुजन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे सोबत अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे,अर्जुनी/मोर. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेेकार,उप कार्यकारी अभियंता शेन्डे,शाखा अभियंता सुनिल राऊत,केतन गिऱ्हेपुंजे तसेच ईतर कर्मचारी उपस्थित होते.