जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे 78 वा स्वातंत्र दिवस साजरा

Spread the love

जनचेतना/तिरोडा/पोमेश रहांगडाले

दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 वा स्वातंत्र दिनानिमित्ताने स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळा समिती अध्यक्षा मा. सौ. अ‍ॅड. माधुरीताई रहांगडाले (जि. प. सदस्य/अध्यक्ष) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उमासंकर गंजीरे, (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), बाबुराव बिसेन (शाळा समिती सदस्य), एन, एस. रहांगडाले (माजी प्राचार्य), अरुणभाऊ पालानदूरकर, टी. टी. रहांगडाले, परिहार सर, शाळेचे प्राचार्य, जी. एच. रहांगडाले, के. बी. बनसोड, पी. एस. रहांगडाले, कु. वाय. यू. राऊत, कु. रक्षिता मेश्राम, कु. बी. कापगते, ऑटोमोबाइल शिक्षक उमेंद्र रहांगडाले, मल्टीस्किल शिक्षक के. जी. आगाशे, अनिल नेरकर, विनोद हरीणखेडे, अरविंद ठाकरे, रमेश दमाहे, कु. एस. डी. पटले, बी. पी. बिजेवार, स्मिता पोलशेट्टीवार, श्वेता मेश्राम, एस. ए. चौहान, हेमंत रहांगडाले, वैशाली जांभुळकर, एन. एम. मारबते, देवा वरठे, मीना बाई खंगारकर, व सर्व शिक्षक वृंद व शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच शाळा समिती चे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त वर्ग 5 वी च्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. तद्नंतर वर्ग 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांचे गीत गायन व भाषण झाले. तसेच वर्ग 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 14 ऑगस्ट 2023 ला रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देवून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन के. बी बनसोड यांनी केले. तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.