जनचेतना/मारेगांव/विजय मत्ते
दिनांक २१/८/२४ बुधवार तालुक्यातील हिवरा मजरा येथील दांडगाव वाळू येथून अवैध वाळूसाठ्याची तस्करी करतांना मारेगाव तहसीलदार व त्यांच्या पथकांनी बुधवारच्या मध्यरात्री छापा टाकून जप्तीची कारवाई केल्याने पुन्हा तस्करात खळबळ उडाली आहे.
महसूल विभागाचा सातत्याने कारवाईचा रेशो कायम असतांना सजग असलेल्या तहसीलदार उत्तम निलावाड यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकांच्या सहाय्याने मध्यरात्री चोपण मजरा शिवारात दबा धरून बसले. अवैध साठा असलेल्या दांडगाव येथून हिवरा मार्गे दोन ट्रॅक्टर वाळू भरून येत असतांना तहसीलदार निलावाड यांनी जप्तीची कारवाई करीत मारेगाव तहसील प्रांगणात लावले. सदर कारवाई सहा वाजता करण्यात आली.मारेगाव तालुक्यात वाळू तस्करांना लगाम लावण्याचे सोपस्कार महसूल विभागाकडून सातत्याने होत असतांना मुजोर वाळू तस्करांचा गोरखधंदा कायम असल्याचे पुन्हा या घटनेवरून सिद्ध झाले. जप्ती झालेले ट्रॅक्टर वाहन अमोल जिवतोडे रा. गोरज व दत्तू लांबट दांडगाव यांच्या मालकीचे आहे.
जप्ती कारवाईत तहसीलदार उत्तम निलावाड यांचेसह तलाठी सनी कुळमेथे, विवेश सोयाम, विकास मडावी यांची भूमिका अग्रेषित राहिली.