जनचेतना/अर्जूनी मोरगांव/प्रशांत उके
गंगाबाई मेमोरियल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अर्जुनी मोर व राज्याचे लोकप्रिय माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री गोंदिया जिल्ह्याची माजी पालकमंत्री आणि अर्जुनी /मोरगाव विधानसभा क्षेत्राची माजी आमदार राजकुमार बडोले फाउंडेशन आणि आशा हॉस्पिटल नागपूर द्वारा यांच्यावतीने रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी भव्य नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी रोज शुक्रवारला सकाळी ९ ते दुपारी १ वाजता पर्यंत ताडगाव रोड पोस्ट ऑफिस जवळ अर्जुनी मोर येथे केले आहे.
सदर आरोग्य शिबिरात कैन्सर, ह्रदयरोग, हड्डीरोग, कान नाक घसा, बालरोग, स्त्रीरोग, दंतरोग मानसिकरोग रोगाचे , निदान करुन उपचार करण्यात येणार आहे. तरी पण अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी भव्य नि:शुल्क आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे.