जलाशयाचे पाणी ओव्हर फ्लो; ‘या’ गावांना मोठा धोका

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके

गेली चार दिवसापासून अर्जुनी मोर तालुक्या सह गोंदिया जिल्हा व सर्वत्र पावसाने कहर केल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन दिवसात नवेगाव बांध जलाशय ओव्हर फ्लो झाला ओव्हर फ्लोचे सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी नवेगाव बां येथील छोट्या मुलापासून वृद्धांपर्यंत गर्दी झालेली आहे.

त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वत्र पावसामुळे नदी नाले ओढे तुटुंब भरून वाहत आहेत सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेती पाण्याखाली गेलेली आहे. गावा गावाला जोडणारे मार्ग बंद झाली असून केशोरी- गेवरर्धा मार्ग, केशोरी बंदय मार्ग वडसा, केशोरी चिचोली महागाव मार्गा ,इळदा कुरखेडा मार्ग सर्व पाण्याखाली रस्ता गेल्याने बंद झाले आहेत. दिनकर नगर (बंगाली कॅम्प )व जरूघटा या गावांमध्ये गावाशेजारील नाल्याचे पाणी शिरल्याने अनेक लोक बेघर झालेली आहेत. तसेच झालेल्या अतिवृष्टीमुळे कान्होली येथील मामा तलाव फुटल्याने संपूर्ण तलाव रिकामा झाला आहे. मात्र या पुराच्या पाण्यामुळे कसलीच मनुष्य हणी झालेली नाही.

राज्यात प्रसिध्द असलेल्या इटियाडोह धरणात दोन दिवसाआधी फक्त 23 टक्के जलसाठा होता .तर आज दिनांक 22 /07/ 2024 ला सायंकाळी सहा वाजेपर्यंत 89.33 टक्के जलसाठा आल्याने रात्र पर्यंत इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहे. इटियाडोह धरण ओव्हर फ्लो झाल्यास पुष्पनगर अ, पुष्पनगर ब या बंगाली वसाहती गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने अधिकारी व प्रशासनाकडून वारंवार नदीकाठावरील गावांनी सुरक्षित स्थळी व सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.

संपूर्ण तालुक्यात गावागावात वाहणारे नदी नाले ओढे यांना पूर आलेला असून छोटी मुलं व वृद्ध तसेच कुणीही पुराच्या ठिकाणी जाऊ नये, अशी सुचना अर्जुनी मोरचे उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शाहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिलेला आहे. केसरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जनजीवन विस्कळीत झालेला आहे.गौरनगर बंगाली वसाहतीमधील ११वर्षाच मुलगा नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे.