जनचेतना/गोंदिया/अर्जुनी मोरगांव/सचिन बोपचे
नवनिर्वाचित खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आज ता.5 जुलै रोजी अर्जुनी मोर. तालुक्यात जि.प.क्षेत्रनिहाय दौरा कैला.सर्वप्रथम बोंडगांवदेवी येथे काॅग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद पाऊलझगडे यांचे निवासस्थानी जि.प.क्षेत्रनिहाय आढावा बैठक घेण्यात आली.सर्वप्रथम माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे,तालुका कार्याध्यक्ष प्रमोद पाऊलझगडे, मोरेश्वर सोनवाने,रविंद्र खोटेले व जि.प.क्षेत्रातील अन्य मान्यवरांचे हस्ते नवनिर्वाचित खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी बोंडगांवदेवी क्षेत्रातील जनतेनी आपल्या भागातील समस्यां खासदार महोदयाकडे मांडल्या.
यात प्रामुख्याने आवास योजना,पाणी पुरवठा,शेतीसाठी विजेच्या समस्या,बंद असलेला भेल प्रकल्प, रखडलेली झासिनगर उपसा सिंचन योजना,एमआयडीसी,जलजिवन योजना,शिक्षण, ईटियाडोह व नवेगावबांध जलाशयाचे पाणी बोंडगांवदेवी परिसरात आणण्याबाबत,तसेच तालुक्यात लहानमोठे उद्योगधंदे आणण्याबाबत खासदार महोदयांना अवगत केले.नवनिर्वाचित खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी सर्व समस्या गांभीर्यपूर्वक ऐकुन त्या समस्या सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी खासदार डाॅ.प्रशांत पडोळे,गोंदिया जिल्हा काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, तालुका काॅग्रेस अध्यक्ष घनशाम धामट,कार्याध्यक्ष प्रमोद पाऊलझगडे, राजु पालीवाल,आनंदकुमार जांभुळकर, राजेश नंदागवळी, डाॅ.भारत लाडे,अनिल दहिवले, केतन मेश्राम, मोरेश्वर सोनवाने, अतुल बन्सोड,रविंद्र खोटेले, विविध गावातील सरपंच व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक चंद्रशेखर ठवरे,संचालन मोरेश्वर सोनवाने तर आभार रविंद्र खोटेले यांनी मानले.यानंतर खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी माहुरकुडा,इटखेडा, महागाव,केशोरी,गोठणगाव, नवेगावबांध तथा अर्जुनी मोर. येथील कार्यकर्त्यांसी संवाद साधत संपुर्ण तालुक्याचा आढावा घेतला.