अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ताकदीने लढणार : तालुका अध्यक्ष दिनेश कोरे

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज मात्र या पक्षाचे गट पडल्यानंतर या क्षेत्रातील विद्यमान आमदार अजित पवार गटात गेल्यानंतरही शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विचारसरणीवर काम करीत शरदचंद्र पवारांच्या विचारांप्रमाणे या विधानसभेतच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरात आपले कामकाज चालविले. अनेक आंदोलने केलीत. काहींना यश आले तर काही यश मिळण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लढणार असल्याचे मत तालुका अध्यक्ष दिनेश कोरे यांनी व्यक्त केले.

सविस्तर असे की, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर काम करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. या विचारसरणीवर अनेक मतदारांचा विश्वास आहे. या विश्वासानुसारच मतदारांनी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निवडून दिले होते मात्र निवडून आलेल्या उमेदवाराने शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीला फाटा देत दुसऱ्या गटात प्रवेश केल्याने त्या भागातील मतदार त्या लोकप्रतिनिधीवर नाराज आहेत.
दरम्यान, विद्यमान लोकप्रतिनिधी असताना देखील या भागातील अनेक समस्या शरदचंद्र पवार यांच्या विचारांना घेऊन कार्य करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितल्या जातात. पदाधिकारी, कार्यकर्ते देखील त्यांच्या समस्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून सांगतात, निवेदन देतात. एवढे झाले नाही तर त्यासाठी उपोषणे, आंदोलने करतात. यापैकी बऱ्याचशा उपोषण आंदोलनांना यश आले काही मागण्या सरकार दरबारी मांडण्यात आल्या आणि त्यांनाही येत्या काही दिवसांत यश मिळणार आहे.

जिल्ह्यातील शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीवर काम करीत या भागातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडल्या. तालुका, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाच नव्हे तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांसह थेट शरदचंद्र पवार यांना भेटून या जिल्ह्यातील अनेक समस्या सांगितल्या. त्यांना देखील या भागातील जनतेविषयी आपुलकी आहे त्यामुळे ते अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात शरदचंद्र पवार गटाचाच उमेदवार देशील देतील अशी अपेक्षा आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा राहिल्यास येथील जनताही त्यांच्या पाठीशी राहील असा ठाम विश्वास तालुकाध्यक्ष दिनेश कोरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व बूथ कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. पक्षाचे विचारसरणी व पक्षांचे नागरिकांविषयीचे विविध विचार या भागातील नागरिकांना पदाधिकाऱ्यांमार्फत समजावून देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांचा जिल्ह्यात मोठा मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष दिनेश कोरे यांनी दिली आहे..