पूरपीडितांची व्यथा पाहून सुनिल मेंढे झाले भावूक

Spread the love

पावसाची तमा न बाळगता भिजत दिला ग्रामस्थांना धीर

जनचेतना/भंडारा/तुषार पशिने : लोकांनी निवडून दिले नाही म्हणून त्यांना, वाऱ्यावर सोडण्याचा स्वभाव नाही. सेवाभाव अंगी असल्याने पराभवानंतरही खचून न जाता माजी खासदार सुनील मेंढे यांनी पावसाची तमा न बाळगता ओले चिंब होत पूरपिडीता पर्यंत जात त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. वास्तव पाहून यावेळी ते भावूक झाले होते. झालेल्या नुकसानीचे कमी जास्ती असे मोजमाप न करता शासनाने सरसकट मदत द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी शासनाकडे केली. दोन दिवसांपूर्वी पवनी आणि लाखांदूर तालुक्यात पावसाने कहर केला. त्यात सर्वाधिक बाधा पवनी तालुक्यातील आसगाव आणि लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावांना बसली. या गावांच्या परिघात येणारी इतर गावेही बाधित झाली मात्र तुलनेत तीव्रता कमी होती.

दरम्यान ज्या दिवशी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याच दिवशी दिल्लीत असूनही रात्री उशिरापर्यंत प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून मदत लवकर पोहोचावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या माजी खा. सुनील मेंढे यांनी दिल्लीवरून येताच थेट पीडित गाव गाठले.आसगाव, लावडी, मोहरी, ढोलसर, ओपारा, बोरगाव, मोखारा, पालोरा, विरली, भागडी, चिचोली यासह अनेक गावांना भेटी देत वास्तव आपल्या डोळ्यांनी पाहिले. आज गावातील 90 टक्के घरे पाण्यात गेली होती. घरातील अन्नधान्य, साहित्य, विद्यार्थ्यांची पुस्तके, कपडे एवढेच नाही तर अंथरूण पांघरूणही पाण्यामुळे खराब झाली होती. व्यवसायिकांच्या दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील वस्तू, गोदामातील साठवून ठेवलेल्या साहित्याला फटका बसला. पावसाने भिजून पडण्याच्या स्थितीत आलेल्या भिंती, खराब झालेले साहित्य आणि रात्रीच्या वेळी ओढविलेली परिस्थिती सांगताना गावकऱ्यांचे पाणावलेले डोळे पाहून सुनील मेंढे भावूक झाले होते. जनावरांचा चारा, आणून ठेवलेले खत भिजलेले पाहूनही मा. खासदारांनी चिंता व्यक्त केली. काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावरही त्यांनी ग्रामस्थांची मते जाणून घेतली.

माजी खासदाराच्या तोऱ्यात न वावरता त्यांनी सातत्याने पडत असलेल्या पावसाची कोणतीही तमा न बाळगता ओलेचिंब होत घराघरात भेटी देऊन माता भगिनींची आणि त्या घरातील कुटुंब प्रमुखांची भेट घेतली. 24 तास घरे पाण्याखाली राहिली त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. कोणाचे किती नुकसान याचे मोजमाप न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याची यावेळी सुनील मेंढे यांनी सांगितले.माजी असूनही आजींना लाजवेल अशा पद्धतीने आस्थेने ग्रामस्थांची विचारपूस करून माजी खासदारांनी पुन्हा एकदा आपल्या लोकाभिमुखतेचा परिचय दिला.

यावेळी विधानसभा प्रमुख अनुप ढोके, सरपंच कोरे ताई, उपसरपंच महेश फुंडे, मोहरीचे सरपंच अरविंद लांजेवार, उपसरपंच हुमणेजी, ओपाराचे सरपंच पल्लवीताई राऊत, ढोलसर चे सरपंच सुचिता चहांदे, ढोलसरचे उपसरपंच कुंजीलाल राखडे, हिरालाल वैद्य, नायब तहसीलदार धुर्वे मडम, तहसीलदार सोनोने, गटविकास अधिकारी गरुड, विदर्भ पाटबंधारे चे सोनटक्के, सोनू भाजीपाले, राजेश भेंडारकर, हरिचंद्र भेंडारकर, यादवराव धनजोडे, रवींद्र जिभकाटे, आशु मेंढे, मोहन कुर्झेकर, रोशन भाजीपाले, नेतराम सेलोकर, यादव भेंडारकर, मंगेश माथुरकर, श्याम बावनकर, विश्वनाथ भेंडारकर, भोवतेजी, रघु लांजेवार, मुकुल शहारे, गावकरी आदी उपस्थित होते.