जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
दिनांक 08/06/2024 रोजी सायंकाळी अर्जुनी मोरगाव येथे आठवडी बाजारात जबरी चोरी करणाऱ्या चार इसमांना पोलिसांनी मोबाईल सह ताब्यात घेतले.अर्जुनी मोरे येथे आठवडी बाजारात श्री सुनील सोनकुसरे हे भाजीपाला खरेदी करत असतानामो बाईल चोरट्याने त्यांच्या शर्टच्या खिशात हात घालून मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हात पकडला त्यानंतर चोरट्याने हाताला जोरदार झटका दिला व इतर दोन साथीदार यांनी सोनकुसरे यांना जोराचा धक्का देऊन तिघेजण जबरदस्तीने मोबाईल घेऊन पळ काढू लागले व काही अंतरावर उभे असलेल्या चार चाकी गाडीतून आरोपी चालकाच्या मदतीने पळून जाण्याच्या तयारीत असताना बाजार बंदोबस्त येथे कर्तव्यावर असणारे पोलीस हवालदार रमेश सेलोकर, गिरीश लांजेवार, बापू येरणे, संजय मेश्राम, लोकेश कोसरे, तिलक पर्वते यांच्या मदतीने सपोनि संभाजी तागड व पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार नलावडे यांनी पळून जाणारे आरोपी बिष्णु अनिल नोनिया वय 24 वर्ष रा महाराजपुर झारखंड, मनीष कुमार मनोज तुरी वय वीस वर्ष रा भागलपूर बिहार, सुंदर देबा नोनीया वय 42 वर्ष रा वर्धमान पश्चिम बंगाल व प्रफुल्ल नेमचंद्र नागतोडे वय 27 वर्ष रा नागपूर यांना चार चाकी वाहनांसह ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली.
आरोपींकडून विविध कंपनीचे एकूण चार किमती मोबाईल ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला.गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, व पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार नलावडे करीत आहेत.