जनचेतना/तिरोडा/दिपक जायसवाल : तालुक्यातील सरांडी येथे मागच्या वर्षी घरगुती विहिरीतील विषारी वायूमुळे चार जणांच्या मृत्यू झाला होता. या दुर्दैव घटनांमध्ये खेमराज गिरधारी साठवणे वय ४४ , प्रकाश सदाशिव भोंगाडे वय ४०, सचिन यशवंत भोंगाडे वय २८, महेंद्र सुखराम राऊत वय ३४, असे मूत्यकांचे नावे आहेत. या घटनेमुळे सर्व गावात सोककळा पसरली होती. हेमराज साठवणे हे सकाळी घराच्या मागील भागात असलेल्या बंद पडलेली मोटर काढण्याकरिता उतरले होते. १५ ते २० मिनिटे होऊ नये ते व्हेरी बाहेर आले नाही त्यामुळे खेमराज भाऊ परलाद हा शेजाऱ्यांना बोलवायला गेला. शेजारी राहणारे सचिन बोंगाडे खेम्राज्याला शोधण्यासाठी विहिरीत उतरला तो विहिरीत उतरत असताना काही अंतरावर खाली पडलं हे बघून त्याला वाचवण्याकरिता सचिनला काका प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत हे देखील विहिरीत उतरल्यामुळे विषारी वायूमुळे गद मरून सर्वांचे मृत्यू झाले होते.
दि. २८ जून २०२३ रोजी मृत्यु शेतकरी यांच्या परिवाराला बच्चू कडू यांनी सातवांना भेट देऊन शासनाकडून आर्थिक मदत देण्याची हमी दिली होती. तसेच तहसीलदार यांना मोबाईलवर बोलून पूर्ण घटनेची माहिती विचारली केली होती व घटनेची चौकशी करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. प्रहार चे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, तालुकाध्यक्ष प्रदीप नशीने व सर्व पदाधिकारी यांनी बच्चू कडू यांच्याकडे सातत्याने पाठपुरवठा केला.दि.२८-११-२०३३ रोजी बच्चू कडू यांनी मदत व पूर्णवसन, महसूल व वन विभागाचे सचिव यांना सरांडी येथे विहिरी त निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे मृत्यू झालेल्या परिवाराला तत्काळ विशेष आर्थिक मदत देण्याबाबतचे पत्र दिले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेट देऊन यासंदर्भात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना रुपये ५ लक्ष इतकी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी केली होती. बच्चू कडू यांच्या या मागणीला मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी गोंदिया यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य एकूण रुपये १४ लक्ष परस्पर वर्ग करण्यात आले आहे. तालुक्यातील सरांडी गावात झालेल्या या दुर्दैवी घटना मधील पीडित परिवाराला आर्थिक मदत मिळवून देण्याकरीता प्रहार चे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, तालुकाध्यक्ष प्रदीप नशीने तसेच जिल्ह्यातील सर्व प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचे आभार मान्य केले.