जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
अर्जुनी मोर:- स्वच्छता ही स्वस्त आरोग्याची पहिली पायरी असते. आपले परिसर, आपले शरीर, स्वच्छ ठेवल्याने कुठल्याही प्रकारची रोगराई पसरत नाही. स्वच्छता बाळगल्याने अतिगंभीर आजारांवरही ताबा मिळविता येतो. यासाठी जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा नगरपंचायत अर्जुनी मोर अंतर्गत “आपली स्वच्छता, आपले आरोग्य” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
1 जुलै ते 31 ऑगस्ट कालावधी दरम्यान नगरातील विविध ठिकाणी स्वच्छता संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. स्थानीय मामा तलाव, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन, अंगणवाडी क्रमांक 7 अशा विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अंगणवाडी क्रमांक 7 येथे स्वच्छ सर्वेक्षण माजी वसुंधरा ब्रँड अँबेसेडर अश्विन सिंह गौतम यांच्यामार्फत शारीरिक स्वच्छता ठेवण्यासंदर्भात अंगणवाडी सेविका प्रणिता गंथडे यांच्या उपस्थितीत चिमुकल्यांच्या हात धुण्याच्या कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
31 ऑगस्ट पर्यंत सुरू असलेल्या अभियानात नगरवासीयांनी मोठ्या संख्येत सहभाग घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे नगरसेवक तथा बांधकाम सभापती राधेश्याम भेंडारकर , नगरपंचायत मुख्याधिकारी राजू घोडके, प्रशासकीय अधिकारी तथा स्वच्छता प्रमुख अमोल जाधव, स्वच्छता समन्वयक निमिश मुरकुटे, यांच्यातर्फे करण्यात आले.