विधानसभा काँग्रेसच्या वाट्याला सुटतील की शिवसेना (उ.बा.ठा) जातील

Spread the love

जनचेतना/वनी/विजय मत्ते

वनी विधानसभा काँग्रेसच्या वाट्याला सुटतील की शिवसेना (उ.बा.ठा) जातील हे चित्र अद्य स्पष्ट झालेले नाही तरीपण काँग्रेस पक्षाकडून मजबूत दावेदारी केली जात आहे. मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला मिळतील म्हणून काँग्रेस इच्छुक उमेदवार ला पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी अर्ज करण्याच्या तयारीला लागले आहे. वनी झाली जरी झाली आता फक्त उरला मारेगाव मारेगाव झरी तसा एकच तालुका असल्यामुळे त्या वेळेस मारे गावला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली ती पण अल्पसी त्यानंतर झरी हा वेगळा तालुका निर्मित झाला आणि जरी तालुक्याला संधी मिळाली ही मारेगाव तालुक्यातील जनतेची मागणी आहे.

प्रत्येक निवडणुकीत मारेगाव तालुका तिल जनता काँग्रेसच्या सोबत आहे. आजही मालेगाव तालुक्यातील जनता काँग्रेसच्या सोबत राहतील काही अपवाद वगळता काँग्रेसचा बोला बाल आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती खरेदी विक्री बाजार समिती सहकारी सोसायटी अशा प्रत्येक क्षेत्रात काँग्रेसची पकड मजबूत आहे ते आपल्याला झालेल्या लोकसभा निवडणुकीत बघायला पण मिळाला काँग्रेस च्या उमेदवाराला दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रात भरभरून मतदान झाले. आणि 19 हजाराची लीड मारेगाव तालुक्यातून मिळाली हीच लीड येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मारेगाव तालुक्यातून उमेदवारी दिली तर यांच्यापेक्षा ही लीड जास्त राहील हे नाकारता येणार नाही असा आवाज जनतेमधून ऐकायला मिळत आहे मारेगाव तालुक्यातून सौ अरुणाताई खंडाळकर यांना काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार आहे.

त्यांना काँग्रेसने संधी दिली तर नक्कीच विजयी उमेदवार असतील त्यांचा वनी झरी या तालुक्यातील संपर्क दांडगा आहे. त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचे सासरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ नेते नानाजी खंडाळकर ते 1962 ते 1996 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य होते 38 वर्ष सतत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती बाजार समिती खरेदी-विक्री वसंत जिनिंग अशा त्यांचा कार्यकाळ राहिला त्यांचा पण जनतेसोबतचा जनसंपर्क दांडगा आहे.

काँग्रेसकडून नानाजी खंडाळकर 1985 ला उमेदवारी मागितली होती पण काँग्रेस यांनी उमेदवारी नाकारली त्यांनी सोबत राहिले त्यांचा राजकीय वारसा सोबत घेऊन सौ अरुणाताई खंडाळकर पंचवीस वर्षापासून तालुक्यात पंचायत समिती सभापती उपसभापती जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशा लोकप्रिय नेतृत्वाला संधी मिळावी ही मालेगाव तालुक्यातील जनतेची मागणी आहे.