अर्जुनी मोरगांव शहर ची विस्तारीत बैठक संपन्न

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोर/प्रशांत उके

राजकुमार बडोले माजी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १/७/२०२४ ला रोज सोमवार ला दुपारी ४ वाजता अर्जुनी मोर शहर ची विस्तारीत बैठक आयोजित करण्यात आली होती. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात विचार मंथन करून पक्ष संघटन तसेच आगामी निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटना बांधण्यासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले यासह अनेक विविध बाबीवर चर्चा करण्यात आली.

यावेळी बैठकीत तालुका अध्यक्ष विजय कापते, मुकेश जायस्वाल शहर प्रमुख अर्जुनी मोर, डाॅ. नाजूक कुंभरे जिल्हा महामंत्री, नुतनलाल सोनवणे प. स सदस्य, यसकुमार शहारे नगरसेवक, अ. मोर, कृष्णा पांडुरंगजी लंजे कार्यकर्ता, राधेश्याम भंडारकर नगरसेवक ,अश्विन गौतम कार्यकर्ता ,श्रीकांत डोंगरवार कार्यकर्ता ,आनंदराव शहरे कार्यकर्ता ,सौ ममता अरुण भैय्या नगरसेविका, गीता ब्राह्मणकर महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष, सौ. सरिता सोमेश्वर चांदेवार कार्यकर्ता, सौ .सपना उपवंशी नगरसेविका, सौ. चंदू लांजेवार नगरसेविका , सौ. शालू मलगाम कार्यकता, विनायक डोंगरवार कार्यकर्ता, आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.