जनचेतना/मारेगाव/विजय मत्ते :- संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करा यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आज दि 18 जुलै रोजी देशभक्ती आंदोलन पुकारण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने जातीनिहाय जनगणनेचा ठराव विधिमंडळात करून केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी भाकपच्या वतीने तहसीलदार उत्तम निलावाड यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करण्यात आली आहे.
देशात दर वर्षांनी जनगणना होत असते 2011 नंतर ही जनगणना 2021 मध्ये व्हायला पाहिजे होती मात्र मोदी सरकारने ही जनगणना अद्यापही सुरू केलेली नाही यूपीए सरकारने 2011 मध्ये जात निहाय जनगणना केली परंतु तिच्या अंतिम निष्कर्ष आधी च प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचे सरकार पाय उतार झाले. त्यानंतर 2014 सालि केंद्रात सत्ता स्थानी आलेल्या मोदी सरकारने सातत्याने जात निहाय जनगणनेचा विरोध केला असा आरोप भाकपचे वतीने करण्यात येत आहे.
त्यामुळे जात निहाय जनगणना करा नोकरी व शिक्षणातील आरक्षणाची 50% मर्यादा संसदेने त्वरित उठवावी अशी मागणी असतानाही जनगणना तातडीने हाती घ्यावी व ती करताना जात निहाय जनगणना करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भाकप तीने प्रधानमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे यावेळ कॉ. बंडू गोल्हार भाकप जिल्हा सहसचिव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिकराव साठे काका सुदर्शन टेका, लता रामटेके धनराज और बाले दत्तू कोहाळे रंजना टेकाळे सुभाष पंधरे विलास डोमणे संदीप टेकाम प्रफुल आले अजबराव रायपुरे बंडू कोळवे सुधाकर मेश्रा मोतीराम धांद्रे यांच्यासह भाकपाचे कॉम्रेड उपस्थित होते.