पाण्यात वाहुन गेलेल्या राजीव अनंत अधिकारी यांच्या कुटुंबाला माजी मंत्री राजकुमार बडोले याची सांत्वन भेट

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके

मित्रांसोबत नाल्याकडे फिरायला गेलेल्या एका बारा वर्षीय मुलाचा पाय घसरून तो बुडाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता गौरनगर येथे घडली. या घटनेची कुठेही वाच्यता झाली नसल्याने अद्याप शोध लागू शकला नाही. बुडालेल्या मुलाचे नाव राजीव अनंत अधिकारी असे आहे. रविवारी पाण्यात बुडाल्याची ही घटना आहे. हे बातमी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना कडताच त्यांनी अर्जुनी मोर तालुक्यातील गौरनगर गाढले.आणि कुटुंबाची स्तांवन भेट घेतली.

याबाबत ताबडतोब तपास कार्य करुन शोध लावला जावा आणि शासना कडून लवकरच कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले याच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी गौरनगर सरपंच विकास वैद्य, विमल सरकार, संजय विश्वास बंगाली आघाडी जिल्हा. अध्यक्ष, सुशील मलीक माजी सरपंच, महानंद दास ग्रा. सदस्य वासुदेव वैद्य, अपूर्ण सरकार त. मुक्ती अध्यक्ष, पवन सरकार, विकास गाईन, विजय कापते तालुका अध्यक्ष भाजपा, लैलेश्वर शिवनकर तालुका महामंत्री आदी उपस्थित होते.