जनचेतना/मारेगाव/विजय मत्ते :- वर्षानुवर्ष थकीत आणि प्रलंबित असलेल्या मारेगाव बस स्थानक बांधकामा करण्याकरिता टाळाटाळ करीत असल्याचा आरो प बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संघटनेचे ज्येष्ठ नेते देवराव वाडगुरे श्याम दादा कोलाम ब्रिगेडचे पांडुरंग टेकाम यांनी 16 जुलैपासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता सदर उपोषणाला भाजपाच्या तालुकाध्यक्ष अविनाश लांबट वशिष्ठ मंडळासहित भेट दिली असता त्यांनी लवकरच आमदार साहेब यांना निदर्शनात आणून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी स्वतः भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट हे स्वतः आमदार संजू रेड्डी बोधकुलवार यांना घेऊन उपोषण मंडपातला भेट देण्यासाठी घेऊन आले त्यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी आमदार संजीव रेड्डी बोधकूलवर यांच्याशी चर्चा करून बस स्थानक बांधकामाचा तत्काळ सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा अशी मागणी केली.
त्यावर आमदार यांनी बांधकामा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पोहोचावा यांना स्वतः मारेगाव येथील राज्य परिवहन मंडळाचे बस स्थानक बनण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव 31 11 23 रोजी झालेल्या बैठकीमध्ये बस स्थानक बांधकामाकरिता मान्यता देऊन 24968 लक्ष मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपोषणकर्त्यांना दिली त्यावर बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी आमदार संजू रेड्डी बोधकुलवार यांच्यासमोर मारेगाव बस स्थानक बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी व निधी वितरण आदेशासह स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा यवतमाळ यांना धनादेश क्रमांक 225097 दिनांक 14/2/2024 रुपये 4993000 निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असताना कामाची सुरुवात का करण्यात आली नाही असा प्रश्न विचारला असता निवेदनुसार 15 ऑगस्ट 2024 रोजी व त्यापूर्वी टेंडर ओपन करून वर्क ऑर्डर घेऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय श्री कोचार यांनी आमदार संजू रेतीबोधकुलवार यांच्यासमोर आश्वासन दिले.