जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके : भारतीय जनता पक्षाची मंडल बैठक आज गोरेगांव येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित होतो. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीवर मंथन करण्यात आले. निवडणुकीत जय पराजय होतच असतात मात्र आपण खचून न जाता जोमाने पुढील निवडणुकांसाठी सज्ज राहीले पाहिजे. मोदीजींच्या लोककल्याणकारी योजना घरोघरी नेल्या पाहिजे असे मत व्यक्त केले. आपण जर विरोधकांची भाषणे ऐकली तर आपल्याला एक लक्षात येईल की मोदीजींनी केलेल्या कामांवर कोणीच बोलत नव्हते. आणि जेव्हा विरोधकांना काही मुद्दाच उरला नाही तर त्यांनी शेवटी जनतेला भीती दाखवून खोटे बोलून मते मिळवली. परीक्षेत नकल करून पास होता येते मेरिट मधे येता येत नाही आणि याच अनुषंगाने विरोधकांचा अप्रचार त्यांना काही जागा वाढवून देऊ शकला. खोट्या प्रचाराने सत्ता प्राप्त होत नसते. त्यामुळे आपण सर्वांनी जोमाने कामाला लागून परत एकदा निवडणुक जिंकण्याचा उद्देश पुढे ठेवून कार्य करुया आणि जिंकूया असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ऍड येसूलाल उपराडे तर मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले सामाजिक न्याय मंत्री उपस्थित होते. सोबत सर्वश्री आमदार विजय रहांगडाले, जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, तालुका अध्यक्ष संजयज् बारेवार तर अतिथी म्हणून प. स. सभापती मनोज बोपचे, कृ. ऊ. बा. स. सभापती गिरधारी बघेले जिल्हा महामंत्री सीताताई रहांगडाले, जि. प. सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, मा जि. प. सभापती विश्वजित डोंगरे, जि. प. सदस्य शैलेश नंदेश्वर, मोरेश्वर कटरे, चित्रकलाताई चौधरी, राजकुमारज यादव, माजी नगराध्यक्ष आशिषजी बारेवार आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.