जनचेतना/अर्जुनी मोर/प्रशांत उके
मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन अजून पर्यंत ओबीसी वस्तीगृह सुरू झालेले नसून, निधी सुद्धा आलेला नाही. त्याकरिता सदर मागणी अधिवेशन मध्ये सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी याकरिता, आ. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना मुंबईमध्ये भेटून निवेदन देण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था व्हावी, वस्तीगृह बनावेत त्याकरिता निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्याकरिता निवेदन देण्यात आले.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे वस्तीगृह सुरू करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करून आदेश सुद्धा देण्यात आले होते.वेळापत्रकानुसार ५ मार्च २०२४ पासून ओबीसी वस्तीगृहे सुरू होणार होते. परंतु, तसे झाले नाही छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती दिनी तरी शासनाने वस्तीगृह सुरू करावी अशी मागणी अनेक ओबीसी संघटनांनी केली होती. परंतु, आतापर्यंत शासनाकडून काहीही हालचाली झाल्या नाहीत. यावरून विद्यमान सरकार ओबीसी विद्यार्थ्यांचे भले इच्छित नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव शासनाचा तर नाही ना..! मागील सत्रात परीक्षेच्या तोंडावर काही अर्ज घेतले होते. निवड यादीत लावण्यात आली. परंतु, वस्तीगृह सुरू न झाल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. आता २०२४-२५ सत्र सुरू झाले आहे. सामाजिक न्याय विभागाद्वारे वस्तीगृहाची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे ७२ वस्तीगृह तत्काळ सुरू करावीत. सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवीधर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेत सामावून घ्यावे.
करिता जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश कार्यालय मुंबई येथे आमदार जयंत पाटील यांना निवेदन सादर केले.निवेदन सादर करतेवेळी,सौरभ रोकडे जिल्हाध्यक्ष, यशवंत परशुरामकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, भुमेश शेंडे तालुकाध्यक्ष आमगाव, दिनेश कोरे तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी, मनोर बडवाईक,तीरथ येटरे , मंजुषा वासनिक,आशिष येरणे जिल्हाध्यक्ष,देवानंद तागडे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, मंजू डोंगरवार , बालू वंजारी, राजू लाडसे, घनश्याम राहांगडाले, अनिता ठाकरे, मनोज डोये, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.