जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
सविस्तर असे की येणाऱ्या 4 महिन्यात लोकसभा निवडणुका येणार आहेत. आजी- माझी आमदार जोरात कामात लागले दिसत आहेत. अर्जुनी मोर विधानसभा मध्ये अजित पवार गटाचे सध्या आमदार आहेत. मग आता पण आमदार मनोहर चद्रिकापुरे यांना जागा मिळणार का असे प्रश्न उपस्थित झाले आहे. चद्रिकापुरे यांच्या बद्दल लोकांना मध्ये वेगळे बोलले जात आहे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला आली होती. युतीमुळे मत विभाजन टळले. व राष्ट्रवादी काँग्रेस चे मनोहर चद्रिकापुरे निवडून आले. गोंदिया जिल्हाचे मताब्बर नेते खा. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटाचे आहेत.
आमदार मनोहर चद्रिकापुरे हे सुद्धा अजित पवार गटाचे आहेत. मात्र नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठे नेते जर सोडले तर राष्ट्रवादीच्या कार्यकत्यानी भाजपाला सहकार्य केले नाही हे कटु सत्य आहे. आता नेमकी विधानसभा उमेदवाराच्या रेस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडुन आ. मनोहर चद्रिकापुरे याचा दावा प्रबळ आहे तर दानेश साखरे नगरसेवक , जि. प सदस्य यशवंत गणविर, सुगत चद्रिकापुरे, अजय लांजेवार हे स्पधैत आहेत. तर नुकत्याच पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मध्ये काँग्रेस ने मुसंडी मारल्याने पक्षाचे मनोधैर्य उंचावले आहे.
काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड, डाॅ. भारत लाडे आनंद जाभुळकर, नगरसेवक अतुल बन्सोड, केतन मेश्राम, चंद्रशेखर ठवरे, अनिल दहिवले, हे उमेदवार स्पर्धेत आहेत. तर भारतीय जनता पक्षा कडुन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पोमेश्वर रामटेके रत्नदिप दहिवले. हे भाजप पक्षा कडुन दावा करत आहेत. की येणाऱ्या काही दिवसांत अर्जुनी मोर येथे राजकीय भूकंप येणार तर नाही ना. असे प्रश्नन उपस्थित झाले आहे. विधानसभा निवडणुक येताच एकमेकाचे पक्ष सोडून वेगवेगळ्या पक्षा मध्ये जाणार तर नाही. ना ? विधानसभा २०१९ मध्ये. मनोहर चद्रिकापुरे राकाॅ ७१९९२( विजय) झाले होते. तर राजकुमार बडोले भाजप ७११०६ तर ८८६ मताने राकाॅ पक्षाचे उमेदवार मनोहर चद्रिकापुरे निवडून आले होते. अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राची ही जागा नेमका कोणता पक्षाला जाणार यांच्या नेम नाही.