सर्व उमेदवारांना किमान या भरती प्रक्रियेत समान संधी मिळावी

Spread the love

जनचेतना/महाराष्ट्र/विजय मत्ते

अखेरीस पोलिस भरतीला सुरुवात होत आहे. पण पोलीस भरती पारदर्शक व्हावी ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस भरती होत असल्याने ग्रामीण भागातून हजारो उमेदवार लांबचा प्रवास करून भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहे.महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी आजही उन्हाचा तडाखा आहे.अश्या वेळी शारीरिक चाचणी वेळी सर्व उमेदवारांची योग्य काळजी घेतली पाहिजे.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, एम्बुलंस सुविधा, तात्काळ वैद्यकीय उपचार, ऊन पावसापासून बचाव करण्यासाठी योग्य सुविधा असणे आवश्यक आहे.

अनेकदा बाहेरगावाहून येणारे उमेदवारांना रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रस्त्यांच्या बाजूला झोपावे लागते. यावेळी अशी स्थिती निर्माण होऊ नये.आधीच रोजगार नसल्यामुळे पोलिस पद भरतीकडे युवकांच्या ओढा जास्त आहे. डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए), अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले अनेक उमेदवार पोलीस भरतीच्या स्पर्धेत आहेत. यंदा आलेल्या अर्जांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक अर्ज उच्चशिक्षितांचे आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांना किमान या भरती प्रक्रियेत समान संधी मिळावी.