जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे
शासनाने गेल्या आठवड्यात पोलीस विभागात प्रशासकीय व विनंती बदली प्रकिया पार पाडली.त्यामध्ये गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांची पुणे शहर येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांची गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणुन पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी नियुक्ती केली आहे. पर्वते यांनी यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखा,नवेगावबांध,डुग्गीपार येथील पोलीस स्टेशनचेही काम सांभाळले आहे.