तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचनामा करण्याण्याचा मुहूर्त सापडेना

Spread the love

अवकाळी पाऊस मुळे झाले पिकाचे नुकसान

जनचेतना/सालेकसा/तमिल टेंभरे

गोंदिया जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ज्या नावाने जिल्हा ओळखला जातो त्या पिकाचा अवकाळी पाऊस मुळे सलग दोन आठड्यां पासून शेतकऱ्यांचे धान पीक शेतात नेतसणाभुत होत होऊन सुद्धा कोणतेही तालुक्यातील कर्मचारी वृंद पंचनामा करण्या साठी शेतात आले नाही . जो पर्यंत शेतकरी चा शेतमाल पूर्ण पणे जीर्ण होणार नाही तो पर्यंत तालुक्यातील कर्मचारी यांचे डोळे उघडतं नाही अश्या प्रकारे चर्चा शेतरीवर्गा मध्ये जोमाने चालत आहे असे दिसून येत आहे. केंद्र शासाच्या व राज्य शासन च्या माध्यमाने फक्त 1₹ रुपयात पिक बीमा काढला परंतु त्या पिक विमा कंपनी ची ऑनलाइन अर्ज किंवा नोंदणी करण्या करिता साईड उघडत नाही शासणा अटी व शर्ती मुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पूर्ण पणें मिळत नाही . सलग दोन आठवडे होऊन सुद्धा कर्मचारी कार्यालय च्या बाहेर पाऊल टाकू शकत नाही व बीमा कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा कोमात गेली की काय असे आढडत आहे तर मंग या अन्न दाता चा वाली कोण? असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो.

   शेतकऱ्यांचे पिकाचे सरसकट पंचनामे करून कडपे व पुंजने सोबत उभा पिक या सर्व प्रकारच्या पिक नुकसानीचे पंचनामा करून नुकसान भरपाई करिता नोंदणी करण्यात यावी व लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.

  - तमिलकुमार टेंभरे सरपंच ग्राम पंचायत दरबडा