भंडारा-गोंदियाच्या विकासाकरीता प्रफुल पटेलांना पुन्हा सहा वर्षाकरीता राज्यसभेत पाठवले – उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

जनचेतना/गोंदिया

आम्ही विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत गेलो आहोत.काही लोक चुकीचा प्रचार करतात,त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे.महाराष्ट्राच्या विकासासह भंडारा-गोंदियाच्या विकासाकरीता प्रफुल पटेलांना काही अडचणीमुळे पुन्हा सहा वर्षाकरीता आम्ही त्यांना राज्यसभेत पाठवले आहे.जातीपातीचे राजकारण न करता विकासाला प्राधान्य द्यायचे आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.ते सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या गोंदिया-भंडारा जिल्हा कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात आज(दि.7) बोलत होते.

पुढे बोलतांना पवार म्हणाले की,धान उत्पादक शेतकर्यांना बोनसच्या स्वरुपात मदत म्हणून 20 हजाराची मदत जाहीर केली होती,त्या पोटीची दीडहजार कोटीची रक्कम आजच सर्व जिल्ह्यांना वितरीत करण्यात आले आहे. विदर्भातील सिंचनाचा बॅकलाग पुर्ण करण्याकरीता अर्थसंकल्पात 2 हजार कोटीची तरतूद केली आहे.आत्ताच आमदारांनी मला मतदारसंघातील काही सिंंचन प्रकल्पाकरीता निधीची मागणी केली आहे.त्या प्रकल्पाच्या कामाना निधीही देतो. आचारसंहितेपुर्वी सुप्रमा ही देतो तुम्ही चिंता करु नका. उमरझरी, मुरदोली सिंचन प्रकल्पाला पुर्ण निधी देतो,तुम्ही पाठपुरावा करीत राहा मीच अर्थमंत्री आहे असे सांगतच निवडणुकीपुर्वी सर्व कागदपत्र तयार करा असे म्हणाले.आम्ही वचनपुर्ती करणारे आहोत घोषणापुर्तीवाले नाहीत.सिंचन प्रकल्प असो की रस्त्याची कामे यात शेतजमिन जात असेल तर आता रेडीरेकनरच्या तीनपट पैसा शेतजमिन गेलेल्याना देण्याच्या निर्णय घेतल्याचेही पवार म्हणाले.

लोकसभा विधानसभा जागेचा निर्णय दोन दिवसात घेणार आहोत.महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आणून देशाच्या विकासाकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे असल्याचे सुतोवाच पवारांनी केले.तर गोंदियाच्या विमानतळावरुन 2025 ला नवी मुंबई विमानतळ सुरु होताच गोंदिया मुंबई विमानसेवा सुध्दा सुरु करण्यात येईल याची ग्वाई देत या विमानसेवेमुळे उद्याेग विकासालाही चालना मिळणार असल्याचे अजित पवार म्हणाले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.संचालन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.