जनचेतना/देवरी/नेहा ठाकुर
आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील ग्राम पुराडा येथे माजी आ.संजय पुराम यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी माजी आ.संजय पुराम यांनी शेतकरी बांधवांना आपले धान शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विकण्याचे आवाहन केले. तसेच शेतक-यांना मार्गदर्शन करतानी बोलले केंद्र सरकार किसान सन्मान योजने मार्फत शेतकरी बांधवांना ६ हजार रुपये देते त्यालाच जोड म्हणून राज्य सरकारने मोदी किसान सन्मान योजना सुरू केली असून ६ हजार रुपये शेतकरी बांधवांना देणार आहे. केंद्राचे ६ आणि राज्याचे ६ असे एकूण १२ हजार रुपये प्रति वर्ष शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे. अशी माहिती दिली. सोबतच ई केवाईसी सुद्धा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.राज्याचे व केंद्राचे सरकार शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेत असतात कारण हे गोरगरिबांचा सरकार आहे असेही धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन दरम्यान माजी आ.संजय पुराम बोलले.