जनचेतना/गोंदिया/विजेंद्र मेश्राम
गोवारी स्मारकाची पूजन करून शहीद झालेल्या 114 आदिवासी गोवारी बांधवांचा जय घोषणा करून स्मरण करण्यात आले.. 23 नोव्हेंबर 1994 ला नागपूरमध्ये टी पॉइंटवर झालेल्या चेंगराचेंगरीत 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला 29 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गोवारी शहीद स्मारक, आखर चौक परिसरात “अभिवादन सभा’ घेण्यात आली. फुलांनी सजविलेल्या शहीद गोवारी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गोवारी बांधव मोठ्या संख्येने आले होते. आणी झालेल्या घटनेवर प्रकाश टाकण्यात आले.
यात प्रामुख्याने उपस्थित नवरगाव कलाचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रा. प. सदस्य, गावचे पोलिस पाटील, गावातील मोठ्या संख्येत गोवारी बांधव आणी आजूबाजूच्या परिसरातील गोवारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…सदर कार्यक्रमाचे रूपरेखा जयेंद्र शेंदरे आणी सूरज गजबे तर संचालन नरेंद्र गजबे यांनी केले.