जनचेतना/भंडारा/ गोंदिया
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत.गोंदिया- भंडारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.
बुधवार, 27 मार्च रोजी भाजप उमेदवार सुनील मेंढे यांची उमेदवारी रॅली सुरू होऊन जाहीर सभेच्या ठिकाणी पोहोचली.दरम्यान, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महायुती कार्यकर्त्यांमध्ये मंचावर बसलेल्या भाजप नेत्यांना संबोधित करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, गेली 35 वर्षे तुमची आणि आमचीच लढाई होती.जे काही उरले आहेत ते सुद्धा आपलीच निर्मिती आहेत, त्यामुळे त्यांना जास्त नावे ठेवू नका, काळजी करू नका, ती आपलीच ‘पैदाइश’ आहे, असे पटेल म्हणाले. प्रफुल्ल पटेल इथेच थांबले नाहीत, तर मंचावर बसलेल्या भाजप नेत्यांकडे बोट दाखवत ते म्हणाले, तुमच्या पक्षात आमच्यातले अनेकजण आहेत तसेच इथे बसले आहेत. आता काय आहे, तू आणि मी थोडा व्यायाम करून तरूण दिसतो, इतर आमच्यापेक्षा खूप ज्युनियर आहेत आणि सीनियर पण आहेत पण ते पॉलिटेक्निकमध्ये ज्युनियर आहे.
दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले.ते जेव्हा काँग्रेससोबत होते. ते काँग्रेसचा वाईट काळ होता. मात्र ते गेल्याने आम्ही आता आनंदी आहोत, असे पटोले म्हणाले.