वाढदिवस निमित्त माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा आगळावेगळा उपक्रम
प्रतिनिधी / सडक अर्जुनी : दिनांक २८ मार्च २०२४ रोजी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा वाढदिवस असून त्यांनी भेटायला येणाऱ्या स्नेही जनाना “बुके हार” ऐवजी “पुस्तक किंवा शालेय साहित्य” घेऊन आपण आलात तर बरे होईल आणि यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वाचा, शिका आणि संघर्ष करा हा मूलमंत्र आपल्याला जपता येईल आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल असे आवाहन आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत असून अनेकांनी याचे स्वागत केले आहे आणि प्रत्येकाने आपला वाढदिवस आदर्श वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी माजी मंत्री राजकुमार बडोले स.०७:०० वा. तिब्बेट कॅम्प येथे बौद्ध पुजेस, स.०९:०० वा. केशोरी येथे आयोजित रक्तदान शिबिर, स.११:०० वा. सडक अर्जुनी येथील निवासस्थानी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम, दु.०१:०० वा. खांबा/जांभळी येथे व्यसनमुक्ती कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे सत्कार समारंभ कार्यक्रम, दु.०३:०० वा. सडक अर्जुनी (निवासस्थान) येथे चष्मे वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.