जनचेतना/अर्जुनी मोरगाव/प्रशांत
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राजकुमार बडोले फाऊंडेशन च्या वतीने दिनांक १९ मे २०२४, दुपारी १ वाजता माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ८० विद्यार्थी पैकी ३६ विद्यार्थी हे अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोर या तालुक्यातील असून सर्वांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संबोधन केले. विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून त्यानुसार शिस्त लावून स्वतःला घडवलं पाहिजे. उच्च शिक्षण घेतल पाहिजे. यासाठी पालकांनी त्यांचे गुण ओळखून योग्य संस्कार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास मदत करते आणि म्हणूनच शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनला अंगीकारून जीवनाची पुढील दिशा ठरविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी, निशाताई तोडासे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदाताई बडोले, गोंदिया जिल्हा शिक्षक संघ संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर सर, पंचायत समिती सडक अर्जुनीचे उपसभापती शालिंदर कापगते, अर्जुनी/मोर पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये, वर्षाताई शहारे, माजी सभापती गिरीधर हत्तीमारे, माजी उपसभापती राजेश कठाणे, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, कोहमारा संरपच प्रतिभाताई भेंडारकर, रंजनाताई भोई, वराठे सर, बोरकर सर, मेश्राम सर, राजेश कडूकर सर, सुरेश अमले सर, सुधीर वाहने सर, राऊत सर, राजकुमार बडोले फाउंडेशन चे प्रशांत शहारे आणि मोठया संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शालिंदर कापगते व आभार प्रदर्शन चेतन वडगाये यांनी केले.