जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे
गोंड गोवारी समाजाच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या न्या.वडणे समितीचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे. तर सकारात्मक अहवाल मागण्याऐवजी राज्य शासन व सरकार समितीला मुदतवाढ देवून चालढकल करीत आहेत. या प्रकाराने गोंड गोवारी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या कृती विरोधात गोंदिया येथे गोंड गोवारी समाजाच्या वतीने २० सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
स्थानिक इंदिरा गांधी क्रीडा संकूल येथून २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे. आक्रोश व्यक्त करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धड·णार असून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला देण्यात येणार आहे. या मोच्र्यात जिल्ह्यातील गोंड गोवारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समीती, शाखा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष सुशिल राऊत व समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी केली आहे.