जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे :- अनंत चतुर्दशीनिमित्त नवीन प्रशासकीय इमारतीसमोर अपना गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित ‘हर हर शंभू’ या शिवस्तोत्राच्या सुप्रसिद्ध गायिका अभिलिप्सा पांडा आणि मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुरेल गायनाचा कार्यक्रम सादर करून गोंदिया वासियांच्या दिल जितलं माजी मंत्री व आमदार डॉ.परिणय फुके यांनी या अप्रतिम कार्यक्रमाला दाद दिली.
कार्यक्रमाला पोहोचून माजी मंत्री श्री फुके यांनी कार्यक्रमात उपस्थित हजारो श्रोत्यांना संबोधित करत भगवान श्री गणेशाचे, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ उदघोषाने जयजयकार केले आणि बाप्पाने सर्वांवर आशीर्वादांचा वर्षाव करत राहो अशी शुभेच्छा दिल्या.डॉ.फुके यांचा गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी मंडळातर्फे श्री.फुके यांचे स्वागत केले. व्यासपीठावर माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार राजेंद्र जैन, बाळाभाऊ अंजनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहरात या गणेश मंडळांनाही दिली भेट..
माजी मंत्री परिणय फुके यांनी शहरातील देवेश मिश्रा यांच्या निवासस्थानाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळानां भेंट देवून श्री गणेशाच्या चरणी आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नाचत बाप्पाला निरोप दिला.
श्री फुके यांनी संतोष भैय्या चौहान यांच्या निवासस्थानाजवळील चिंतामणी गणेश मंडळ स्थानी भेंट दिली। यानंतर बेबी अग्रवाल यांच्या काली मंदिर, रामनगर येथील गोंदियाचा राजा गणेश मंडळांना भेंट देवून बाप्पा च्या आशीर्वाद घेतले. आकर्षक गणेश पंडालच्या सजावटीचे कौतुक केले. यानंतर त्यांनी चेतन सोनछात्रा गणेश मंडळ, श्री टॉकीज चौकाचा राजा, दुर्गा चौक गणेश मंडळ, सिंधी कॉलनी शंकर चौकातील सुवर्ण मंदिर मंडळासह अनेक गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. या मण्डलातर्फे श्री फुके यांच्या स्वागत करण्यात आला.