जनचेतना/मारेगाव/विजय मत्ते
मारेगाव सतत नापीकेसी संघर्ष करत असताना शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामातून शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही आता खरीप हंगामात अगदी तोंडावर आला आहे मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत पेरणी साठी लागणारे बियाणे व खते खरेदीसाठी पैसा आणायचा कुठून ही चिंता शेतकऱ्यांना सतत सतावत आहे गेल्या वर्षी च्या खरीप हंगामात दुष्काळाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले हात तोंडाची आलेला घास हिरावला गेला शेतातून घरात आला मात्र त्यातून लागवड खर्चही निघू शकला नाही खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कंबर कसली एक हंगाम साथ दिली या आशेवर जगत असताना शेतकऱ्याची वारंवार निराशाच होत आहे.
शेतीत राबवताना कामात रात्रंदिवस कित्येकांना बाधा झाली काही शेतकऱ्याचा मृत्यू झाला कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही काय काही शेतकऱ्यांना मदत मिळाली ती कवडीमोल औषधोपचार वर खर्च करावा लागला त्यातून बरे झालेल्या चे पाऊल खरीप हंगामाच्या लागवडीकडे वळले हातात पैसा नसल्याने पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवीत आहे राष्ट्रकुल बँका दरवर्षीप्रमाणे पीक कर्ज वाटपात आखडता हात घेत आहे दरवर्षीचा अनुभव बघला शेतकऱ्यांना खाजगी सावकाराच्या दारात जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही पेरणीच्या वेळी पैसा उपलब्ध न झाल्यास खते व बी बियाण्यासाठी कुठून तजबीज करावी ही चिंता शेतकऱ्यांना सदावत आहे सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जात बुडाले.