जनचेतना/नागपूर/दिलीप तराळेकर:- २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व प्राथमिक जूनी पेन्शन कृती समिती नागपूरच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी(ता.१७ जुलै) संविधान चौक,नागपूर येथे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे-आंदोलन करण्यात आले.२००५ पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित, विनाअनुदानित परंतु २००५ नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या शाळांमध्ये कार्यरत व निवृत्त राज्यातील २६००० कर्मचाऱ्यांना १९८२ ची जूनी पेन्शन योजना शासनाने लागू करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
पेन्शन पीडितांना योग्य न्याय मिळावा यासाठी आंदोलकांनी ‘एकच मिशन,जूनी पेन्शन ‘ अश्या घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.धरणे-आंदोलन यशस्वी करण्यासाठी कृती समितीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गलांडे, अध्यक्ष नरेन्द्र पिंपरे,सचिव नरेन्द्र फाले,रविंद्र हिवरकर, मंजुषा बोधनकर,रविंद्र वाट,पुरुषोत्तम श्रीराव, पंढरी कडू,मोरेश्वर आढाऊ,सुनिल कोल्हे, रामकृष्ण ठाकरे,देविदास इटनकर, राजेश गजभिये,रमेश मेश्राम,प्रतिभा टापरे,योगेश्वर दांडेकर, राजेश थोराने,दिलीप तराळेकर,राकेश पंत,सुधीर बेलखोडे,अशोक घरडे,रूपेश वानखेडे,ऋषीकुमार वाघ,अशोक मेश्राम सह शेकडोंच्या संख्येने पेन्शन पीडित शालेय कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.