तिरोडा शहरात डॉक्टरांकडून कॅन्डल मार्च काडुन निषेध

Spread the love

जनचेतना/तिरोडा/दीपक जायसवाल

कोलकत्ता येथील आर.जी कर मेडिकल कॉलेज इथे एका महिला निवासी डॉक्टर वर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्या पीडित डॉक्टर ला न्याय व डॉक्टरांना मारहाण होत असते त्याचा निषेध म्हणून तिरोडा मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन व वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा तर्फे ता.२० ऑगस्ट मंगळवार रोजी कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली.डॉ. लंजे सर यांच्या हॉस्पिटल पासून ते महात्मा गांधी पुतळा सहिद स्मारक पर्यंत डॉक्टरांनी कँडल मार्च काढत निषेध मोर्चा काढण्यात आला व श्रद्धांजली वाहिली तसेच तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सी.बी आय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली .

यावेळी तिरोडा मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन. अध्यक्ष सविता दुबे उपाध्यक्ष डॉक्टर मंत्री डॉ.सीमा काळे श्रीवास्तव डॉ. आनंद लंजे, डॉ. अविनाश जायसवाल, डॉ.अमोल धुर्वे, डॉ. संजय भगत, डॉ.मनीष दुबे, डॉ. हीतेश मंत्री डॉ. अनिल पारधी, डॉ . प्रभात काळे डॉ. निकेश दुबे डॉ तुषार बडगे डॉ .ताजने डॉ सुजीत चौरसिया, डॉ संजय डॉ सुशील रहांगडाले उपजिल्हा रुग्णालय तिरोडा चे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.