जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे
तिरोडा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी मतदान बूथवर पोलिग पार्टीतील सर्वच कर्मचारी दारू ढोसून असल्याचे आढळून आले. यामुळे तत्काळ सर्वच कर्मचाऱ्याना हटविण्यात आले.
ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण; मतदान प्रक्रिया बंद
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी आज, १९ एप्रिल रोजी सकाळीपासुन मतदान प्रक्रिया सुरू झाली. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मतदान केंद्रावरील बूथ क्रमांक ४८ वर तांत्रिक अडचण निर्माण झाली. मतदान केल्यावर मशीन मधून वीवीपी पॅट स्लीप निघत नसल्याचे समोर आले. यामुळे मतदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सकाळी ९:३० वाजतापासुन मतदान प्रक्रिया बंद पडली. तब्बल तीन तास मतदान प्रक्रिया बंद होती. यादरम्यान २६१ मतदान झाले होते. केंद्रावरील अधिकाऱ्यानी दखल घेत तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.