जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
अर्जुनी मोर तालुक्यातील ग्राम चान्ना बाक्टी, पिंपळगाव, चापटी, येथे अवैध रित्या दारू विक्रीचे अनेक ठिकाणे अड्डे चालतात. यावर प्रशासन का? कारवाई करीत नाही. एकंदरीत या वेवसाईकांकडून प्रशासकिय अधिकाऱ्यांना हप्ते मिळत असतील. त्या मुळे कुठल्याही प्रकारची कारवाई सबंधित यंत्रणा करीत नसावी असा अंदाज केला जात आहे. अर्जुनी/ मोर पोलिस स्टेशन च्या हद्दीत चान्नाबाक्टी, पिंपळगाव, चापटी तिन गावा मध्ये दारु विक्री मोठ्या जोमात सुरू आहे .
सदर गाव अर्जुनी/ मोर तालुक्यातील आहेत.चान्नाबाक्टी, पिंपळगाव, चापटी या तिनहु गावात अवैध रित्या जवळपास ५०ते ७० ठिकाणी दारूची विक्री केली जाते. काही ठिकाणी खुले आम परवाना घेतल्या सारखे विक्री केली जाते. तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने विक्री केली जाते. विशेष म्हणजे खाकी वर्दी मध्ये सुध्दा काही लोक याठिकाणी दारू प्राशन करण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे. पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याना या गावात कुठे कुठे अवैध रित्या दारूची विक्री केली जाते. त्याची माहिती आहे. असे असले तरी कारवाई मात्र शून्य आहे.
महिन्याला लाखो रुपये शासनाकडे पगार मिळत असला तरी अधिकारी चे हप्ते घेतला शिवाय पोट भरत नाही का ? असा सवाल सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाले आहे. या तीन ही गावात वेशनाधिन तरुणायाची फौज निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी त्याच्या कडे आहे . तेच जर आपले ईमान गहाण ठेवत असतील तर सामान्य माणसाने न्याय कुणाला मागावे अशा प्रश्नन आज घडिला निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देतील का आणि या तीन ही गावातील अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या माफियांना तडीपार करतील का ? असा सवाल सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. वेशनाधीन झालेल्या तरुणानी घरा घरात कलह निर्माण केलं आहे. त्यामूळे घरातील संबंध विखुरले जात आहे. याला जबाबदार प्रशासन की दारू विक्री करणारी अवैध यंत्रणा आहे ? ते आता जनतेने ठरवायचं आहे.