जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
ग्रामीण रुग्णालय अर्जुनी/मोरगाव येथे रक्त संकलन पेठी(Blood storage unit) ची नितांत गरज आहे. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक रक्त संकलन अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातून होतो. तरीसुद्धा आपल्या नातेवाईकांना रुग्णांना रक्तपुरवठा करण्याकरिता खूप मोठी पायपीट करावी लागतो. हा होणारा त्रास कमी व्हावा सहज आणि सोप्या पद्धतीने तालुक्यातून संकलित केलेला रक्त गरजू रुग्णांना त्वरित मिळावा याकरिता ग्रामीण रुग्णालय अर्जुनी/मोर येथे ब्लड युनिट स्टोरेज त्वरित सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निवेदना मार्फत करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा मिळवून देण्यात आपण यशस्वी झालो त्याच प्रकारे समस्त नगर तथा तालुका वाशीयांनी या कार्यात सुद्धा सहकार्य करावे जेणेकरून ही सुविधा लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात यशस्वी होता येईल.