देशातील केंद्र सरकार ने नुकताच संसदेतअर्थ संकल्प सादर केला आहे . या अर्थ संकल्पात देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यासाठी कोणतीच भरीव तरतूद करण्यात आली नसल्याने केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र द्वेषी असल्याचा आरोप करूं निषेध करण्यात आला आहे. सदर निषेध २४ जुलै रोजी गोंदिया येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ स्थानिक राका (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या निषेध आंदोलनाचे नेतृत्व गोंदिया जिल्हा राका (शरद पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, बाबा बैस, महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार, जिल्हा महासचिव तीरथ येटरे, बालू वंजारी शेखर चामट पिंटू कटरे प्रकाश वगैरे सय्यद, निखिल चांदेवार देवानंद ताकडे अक्की अग्रहरी यासह अन्य राका पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते.
सत्ता टिकविण्यासाठी केंद्र सरकारची केविलवाणी धडपड – मेश्राम
नुकतेच संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थ संकल्पात आंध्रप्रदेश. विभार राज्य वगळता अन्य राज्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. तथापि या अर्थ संकल्पाने महाराष्ट्र राज्यातील जनतेची घोर निराशा होवून सबंध राज्य उपेक्षित ठरविण्यात आले आहे. देशातील सत्ताधारी सरकार ने केवळ आंध व बिहार राज्यांना भरघोस निधी मंजूर करून देशात सत्ता टिकविण्यासाठी चालविलेली धडपड असल्याचा आरोप गोंदिया जिल्हा राका( शरद पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केला आहे.