रस्ता चिखलमय ; रहिवाशांना त्रास, ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष

Spread the love

जनचेतना/मारेगांव/विजय मत्ते

दांडगाव ग्रामपंचायत वार्ड क्रमांक एक मध्ये रस्ता संपूर्ण चिखलमय झाला असून या वार्डातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे परंतु अनेकदा तक्रारी करून ग्रामपंचायत कडून दखल घेतली जात नाही. दाडगाव वार्ड क्रमांक एक गावातील मध्यभागी असलेला हा रस्ता चिखलमय झाला आहे. या रोडच्या एका बाजूला भूमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले ते नालीचे काम थातुर्मातुर केल्या गेले सचिवाच्या संगणमता करून लाखो रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यातून गायब केले असा आरोप करत सचिवा विरोधात व सरपंच ग्रामपंचायत सध्यक्ष कडून तक्रारीतून करण्यात आला आहे. हा चिखलमयआहे त्या रस्त्यांनी साधा पायदळ सुद्धा जाणे कठीण झाले आहे या गावचे सरपंच पुढारी काय करत आहे याकडे गावकरी बघायची भूमिका घेताना दिसत आहे ग्रामसभेत ठराव घेऊन सुद्धा आजपर्यंत मुरूम गिट्टी का टाकली नाही याकडे गावकरी बघत आहे.

लाखो रुपयाचा आलेला निधी सचिव आणि सरपंच आपल्या घशात घालत तर नाही असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावताना दिसत आहे त्या रस्त्याला गड्डे इतके आहे साधारण मोटरसायकल घर पर्यंत नेने कठीण झाले आहे शाळकरी मुले त्या रस्त्यांनी जाणे कठीण झाले आहे पाणी साचल्यामुळे आरोग्यास हानिकारक झाले आहे हा रस्ता गावच्या मध्यभागी असून याकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष न दिल्यास गावकरी आंदोलनाच्या भूमिकेत दिसत आहे पण सरपंच यावर चुप्पी का साधू आहे हा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे.आणि या रस्त्यावर गावकऱ्याचे अतिक्रमण का हठवतनाही असा प्रश्न सुद्धा गावकऱ्यांना पडला आहे सदरअतिक्रमण हटवून त्या ठिकाणी गिट्टी मुरू त्वरित टाकावी अशी गावकऱ्याची मागणी आहे ही मागणी जर आठ ते दहा दिवसात नाही झाली तर गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.