मानसून तयारी करीता बांधकाम सभापती संजय टेंभरेनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा घेतला आढावा

Spread the love

जनचेतना/गोंदिया/विवेक हरिनखेड़े : तालुक्यातील रावणावाडी प्राथमिक आरोग्य केन्द्र येथील आज दिनांक १८ जुलाई २०२४ रोज गुरुवार ला मान्सून तैयारी आढावा बैठीकीचे ओयाजन सभापती श्री संजयजी टेंभरे अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद गोंदिया यांच्या अध्यक्षेतेखाली सभा घेण्यात आली आहे यावेळी श्रीमती शिलाताई वासनिक सरपंच , डॉ. राम वरठे , सुलाखे उपसरपंच , सुभाष सव्वालाखे , लांजेवार , डॉ सुरजलाल हरिणखेडे , रंजित वासनिक , देवचंद बिसेन , सुनिल टेंभरे रजेगाव , अजेन्द्र चव्हाण सदस्य , राजेश बिसेन उपसरपंच आरोग्य अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यात काही भागात मान्सूनला सुरुवात झालेले आहे पावसळयात जलजन्य किटकनाशक आजार मोठ्या प्रमाणात उद्धवतात त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते अशावेळी ग्रामपंचायतीनी नाली सफाई ठेवणे स्वच्छ परिसर अभियान करणे पाण्याचे स्त्रोत दुरुस्ती करणे ब्लिचिंग पावडर साठा उपलब्ध करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहे.

तालुक्यातील आपत्ती निवारणविषयक साहित्याची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करा, रस्ते, नदी-नाल्यांवरील पूल तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावा, पावसाचा अंदाज यावेळी चांगला असल्यामुळे पूरस्थितीचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, प्रत्येक गांव मध्ये धोकादायक इमारती, पावसामध्ये धोका निर्माण होईल, अशी ठिकाणे यांची तपासणी करून कडक कारवाई करून ती हटवा, भीतीचे वातावरण तयार होणार नाही, याचीही काळजी घ्या.’ असे निर्देश बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी दिले आहे.