जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. त्या अनुसंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विधानसभा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून गोंदिया विधानसभा क्षेत्राची जबाबदारी कृउबास उपसभापती राजकुमार पटले यांना देण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीला घेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात काँग्रेसने मारलेली बाजी ही कार्यकर्त्यांना स्फुर्ती देणारी ठरली आहे.
त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी प्रमोद पाऊलझगडे, तिरोडा विधानसभासाठी डॉ.झामसिंग बघेले व जागेश्वर निमजे, गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी राजकुमार पटले तर आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे उषा मेंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वयक विधानसभा मतदार संघाचा दौरा करून जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी व विविध आघाड्यांची बैठक घेवून निवडणुकीची रणनिती तयार करणार आहेत.