गावभेटीतून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी साधला जनतेशी संवाद

Spread the love

जनचेतना/सडक अर्जुनी/प्रशांत उके

ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामस्थ राहू विविध समस्या भेडसावत असतात. त्यामध्ये प्रशासन बाबत काही तक्रारी असतात सोबतच विकास कारणा संदर्भात देखील अनेक प्रश्न असतात नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत येतील याची वाट न बघता माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले विकास यांनी गोरेगाव तालुक्यातील विविध गावांना भेटीतून नागरिकांच्या समस्या जाणून घेत तत्काळ मार्ग लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले .गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव, गिधाडी, चिल्हाटी, बबई येथे भेट घेत पदाधिकारी नागरिकांसोबत संवाद साधला.

या गावाचे समावेश आहे भारतीय जनता पार्टी सर्वस्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचा दौरा काढला आहे. अंतर्गत म्हसगाव, गिधाडी, चिल्हाटी, बबई या गावांना भेट दिली तेथील शेतकरी शेतमजूर व बेरोजगार युवकांनी त्यांना भेटसावत असणारे विविध समस्या सांगितल्या. यामध्ये प्रामुख्याने कृषी पंपांना वीज पुरवठा, येथील मजुरांच्या हाताला रोजगार , तालुक्यातील युवकाला तालुक्यातच रोजगार संधी उपलब्ध व्हावी, तालुक्यातील एमआयडीसी मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. यासह अन्य समस्या नागरिकांनी सांगितले या समस्या बाबत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठाशी संपर्क साधून येत्या काळात समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.