जनकल्याणकारी योजनेसाठी सदैव तत्पर -माजी सामाजिक न्यायमंत्री- राजकुमार बडोले

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोर/प्रशांत उके

राज्यातील शेतकरी शेतमजूर व सामान्याचे हितासाठी महाराष्ट्र शासन सदैव तत्पर असून, परिसरातील जनतेच्या सोयी -सुविधेसाठी जनतेचा एक सेवक या नात्याने जनकल्याणकारी सुविधेसाठी सदैव तत्पर असल्याचे मनोगत माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत अनेक गावात स्थानिक निधीतून माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध केल्या जात असून, ग्राम भुसारीटोला येथे दहा लक्ष निधीचा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती स्तरावर रस्ता बांधकामांचे भूमिपूजन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

सत्तेत असो वा नसो जनतेला मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नरत राहू व सक्षम महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी हातभार लावण्याचे व्रत आपण घेतले असून हे कार्य सातत्याने सुरूच राहील असा आशावाद सुद्धा व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भुमेश्वर पटले ,पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते, चेतन वडगाये, भुसारी टोल्याचे सरपंच मायाताई राऊत, उपसरपंच प्रीती खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य मनीष सोनवणे, रवींद्र कागगते ,पोलीस पाटील उमेश शहारे, माजी सरपंच उमराव गहाणे, हरिचंद लांजेवार, सुरेंद्र वाघाडे, केशव निर्वाण, गौतम भदाडे, माजी सरपंच हरडे, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.