आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

Spread the love

गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात 2 कोटीच्या निधीतून होणार विकास कामे

जनचेतना/अर्जुनी मोरगाव/प्रशांत उके

तालुक्यातील गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे प्रयत्नाने अनेक गावात आमदार स्थानिक विकास निधी ,2515 तसेच मनरेगा अंतर्गत विविध विकासकामे मंजूर करण्यात आले असून सदर कामांना प्रशासकीय मान्यतेसह 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून 15 जून रोजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, सुशीला हलमारे, पंचायत समिती सदस्य आम्रपाली डोंगरवार, चंद्रकला डोंगरवार, माजी जी. प.सदस्य रतिराम राणे, सरपंच बळीराम टेंभुर्णी, उपसरपंच हरिश्चंद्र घरत,सरपंच छाया अमले, सरपंच करणदास रक्षा, उपसरपंच ताराचंद भोगारे, सरपंच पपीता नंदेश्वर, सरपंच गणेश ताराम, सरपंच संजू इसवार, उपसरपंच दिलीप कुमार तिरपुडे, सरपंच पुष्पा डोंगरवार, सरपंच नरेंद्र लोथे, ग्रामपंचायत सदस्य ममता दोनाडकर, ओमप्रकाश दोनाडकर, यमुना मडावी ,मंगला शेंद्रे, माधव दोनाडकर, सदाशिव घुगुसकर, अवि रहीले, ज्ञानेश्वर टेंभुर्णी ,हिरालाल लांजेवार, महेश डोंगरवार ,पुंडलिक कंगाले, कुमार दोनोडे ,कैलास हेमने,सदस्य कविता कोरेटी, प्रल्हाद पुराम, तुकाराम राखडे, नामदेव इंदरगोटे, केवळराम ताराम, त्रिलोक चौधरी, विजय भोयर, सुनील परते की,सुभाष भोयर, कैलास नंदेश्वर ,सतीश साखरे, सुनील दर्रो, विनोद कोराम, उपसरपंच अनिल पुस्तोडे, योगेश कापगते, कमलेश श्रीवास ,अजित वलके ,ज्ञानेश्वर वलके, प्रकाश ठाकरे, रवींद्र ठाकरे ,जनीराम वलथरे, शिवशंकर टेंभुर्णे , अफरोज शेख, मनोज रामटेके, कविता परतेकि, पुनम साखरे, करू टेकाम, किशोर मडावी, सत्यशीला मडावी, दीनदयाल डोंगरवार, नरेश बोरकर, तुषार बनपुरकर, किरण तिडके, गिरिधारी कांबळे, सदस्य चंद्रशेखर बोरसरे, शेवजी गन्नाके, किशोर तिडके, मंगेश गायकवाड गोपाल नंदेश्वर ,तेजराम शिलार, जितू कोडापे, संतोष कोरेटी,रवी कोडापे मुकेश मलकाम, चैत्राम सिलार, कविता प्रतेकी, सरिता वाल्डे,माधुरी वरवाडे, पपीता वरवाडे ,गणेश वालदे, संगीता शेंडे , पंढरी वालदे,जगदीश कोल्हे,बिंदू ठाकरे,आदी उपस्थित होते.