अर्जुनी/मोरगाव – नवेगाव/बांध येथील महीला सरपंचांनी हानली युवकाच्या कानशिलात, लोकप्रतीनिधींची अशीही दबंगगीरी

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोर/प्रशांत उके

महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असुन या योजनेसाठी घरातील अनेक कर्ते पुरुष व युवक दाखले व कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव/बांध येथे जन्माचा दाखला मागण्यासाठी गेले असता कार्यालयात बसून असलेल्या नवेगाव/बांध ग्राम पंचायत च्या सरपंच सौ.हिराबाई नीलमचंद पंधरे रा.खोली नवेगाव/बांध यांनी आशिष सुभाष लंजे वय 20 वर्ष नवेगाव/बांध दाखला मागण्यासाठी गेले असता सरपंच हिराबाई पंधरे यांनी युवकाच्या कानशिलात हाणल्याची घटना दि.04 जुलै 2024 रोजी गुरुवार ला सकाळी 11:00 वाजता घडली सदर युवक आशीष लंजे हा नवेगाव/बांध येथील रहिवाशी असुन ग्रामपंचायत नवेगाव/बांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्या वतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डन वरती काम पाहत होता.येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करीत होता काही दिवसाआधी त्याला कामावरून काढण्यात आले.


सरपंच सौ.हिराबाई पंधरे यांना आशिष लंजे यांनी पैशाचा हिशेब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे पोलीस स्टेशनला कबूल केले.सदर युवकाने सरपंच सौ.हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगाव/बांध येथे तक्रार नोंदवली असुन (BNS) भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115(2) अंतर्गत एन.सी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर सरपंच हे एक लोकप्रतिनिधी असुन अशा प्रकारे शासकीय कार्यालयात मारहाण करने कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता नागरिकांना पडला असुन सामान्य जनतेवर अशा प्रकारे हात उगारणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींवरती अपात्रतेची कार्रवाई करुन पदमुक्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.