जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
येत्या 19 एप्रिल ला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली असून त्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अर्जुनी मोरगाव ग्राम रोजगार सेवक संघटनेने कायम ठेवला आहे. ग्राम रोजगार सेवकाचे गेल्या आठ वर्षापासून प्रवास भत्ता व अल्पोहार बत्त्याचे ८ वर्षापासून 82 लाख रुपये थकले आहेत परिणामी ग्राम रोजगार सेवकावर उपासमारीची पाळी आली आहे या विषयाच्या अनुषंगाने अर्जुनी मोरगाव पंचायत समिती कार्यासमोर संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करून शासनाची लक्ष वेधले तसेच आयुक्त कार्यालय नागपूर याच्याकडे पाठपुरवठा करून सुद्धा पैसे मिळाले नाहीत ग्रामपंचायत स्तरावर हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणारा ग्राम रोजगार सेवकाचे पैसे शासनाकडे थकल्याने त्यांच्यावर उपासमारी पाळी आली आहे या संदर्भ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सरपंच संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्राम रोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी आयुक्त कार्यालय नागपूर येथे भेट देऊन विचार केली असता शासनाकडे थकीत असलेले पैशाची मागणी केली आहे उपलब्ध झाल्यानंतर पैसे देण्यात येतील असे जानेवारी महिन्यात सांगण्यात आले मात्र अद्यापही पैसे मिळाले नाहीत तर लोकप्रतिनिधीचे सुद्धा याकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे ग्राम रोजगार सेवक संघटना अर्जुनी मोरगाव यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे अर्जुनी मोरगाव चे उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांनी ग्रामरोजगार सेवकाची चर्चा करून निवडणुकीवर बहिष्कार टाकू नका काहीतरी मार्ग काढू अशी आश्वासन दिले पण अद्यापही यावर कुठलाच निर्णय झालेला नसल्याने ग्रामरोजगार सेवकांनी आपला निर्णय कायम ठेवला आहे.